दहशतवादी हाफिज सईदच्या पाकिस्तानातील घराबाहेर शक्तीशाली स्फोट; १० जखमी

लाहौर – येथील जौहर टाउन परिसरात एका राहत्या घरात शक्तीशाली स्फोट झाला आहे. या स्फोटात १० जण जखमी झाले आहेत. महत्वाची बाब अशी की स्फोट झालेल्या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर दशतवादी हाफिज सईद याचं घर आहे.

डॉन टुडे न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर बॉम्बशोधक पथक आणि पोलीस दाखल झाले असून जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

स्फोट इतका भयंकर होता की परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. तर एक इमारत पूर्णपणे कोसळली आहे. जवळपासच्या गाड्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार यात अद्याप १० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या स्फोटामागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. स्फोटावेळी हाफिज सईद घरात होता की नाही याचीही काही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here