पहेलवान मनोज पाटील यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ एरंडोल तालुका अध्यक्ष पदी निवड

जळगाव (निलेश पाटील) – एरंडोल येथील नगरसेवक पहेलवान मनोज पाटील यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ एरंडोल तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मनोज पाटील यांनी एम.एम.पी.एड्.पर्यंत शिक्षण घेतले असून, दादासाहेब डी.डी.एस.पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एरंडोलचे ते तालुकाध्यक्षदेखील आहेत. एरंडोल तालुक्याचे क्रीडा समन्वयक, छत्रपती क्रीडा प्रसार मंडळ व व्यायाम शाळा एरंडोलचे अध्यक्ष, शासकीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र एरंडोलचे अध्यक्ष अशाही जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्थापक पहेलवान गणेश मानुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज पाटील यांची एरंडोल तालुका अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here