वीज वितरणने सक्तीची वसुली थांबवावी; काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांचे आवाहन

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – शहरात वीज वितरण कंपनीकडून सक्तीने वसुली केली जात आहे. विज बिल न भरल्यास जोडणी कट करण्याची मोहीम राबविली जात आहे. कोरोनाने शहरातील अनेक कुटुंब बाधित झाले होते. श्री साईबाबांचे मंदिर बंद असल्यामुळे शिर्डीतील हॉटेल व्यवसाय, हार-फुल विक्री करणारे, दुकानदार तसेच साईभक्तांवर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यवसाय, साईभक्तांना ने-आण करणारा वाहन व्यवसाय (टुरिस्ट)पूर्ण पणे बंद आहे. शिर्डीत जवळजवळ अघोषित लॉकडाउनच आहे.त्यामुळे शिर्डीतील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

अशा या कठीण काळात वीज वितरण कंपनीकडून सक्तीने वसुली सुरू आहे. बिल न भरल्यास वीज कनेक्शन कट केले जात आहे. याबाबत अहमदनगरचे वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री.सांगळे, उपकार्यकारी अभियंता श्री.पाटील, शिर्डी येथील श्री.जगताप यांना भेटून काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी आवाहन केले की, मंदिर सुरू झाल्यानंतर शिर्डीकर पूर्णपणे वीजबिल भरतील परंतु आज रोजी सुरू असलेली कारवाई शिथिल करण्यात यावी.आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना वीज वितरणने कनेक्शन कट करून अंधाराच्या खाईत लोटू नये.shirdi-mseb

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश आरणे, युवक तालुका उपाध्यक्ष मदन मोकाटे, समीर शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here