माजी मुख्यमंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; भेटीनंतर फडणवीस आक्रमक मूडमध्ये

[ad_1]

मुंबई |  राज्याचे माजी मुख्यमंत्री तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या बाधितांच्या नुकसान भरपाईवर उद्धव-फडणवीसांमध्ये चर्चा झाली.

यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरी उपस्थित होते. मुंबईत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात ही भेट झाली. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई सुद्धा उपस्थित होते.

निसर्ग वादळात ज्यांचं नुकसान झालंय त्या नुकसानग्रस्तांना रोख मदत मिळाली पाहिजे, अशी प्रमुख मागणी फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ज्या लोकांना केरोसीन मिळत नाही त्यांना ते मिळालं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

चक्री वादळामुळे झालेल्या नुकसानी नंतर सरकारची कोणतीही मदत जमीनीवर पोहचली नसल्याचा आरोप यावेळी फडणवीसांनी केला. सरकारचं अस्तित्त्व आहे असं दिसत नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.

ट्रेंडिंग बातम्या-

संवेदनशील छत्रपती; बळीराजाचं दुःख न पाहवल्याने राजेंनी स्वतः तिफन ओढली! पाहा व्ही़डिओ

सरकारचा खासगी लॅबला दणका; कोरोना चाचणीच्या शुल्कासंदर्भात घेतला मोठा निर्णय

महत्वाच्या बातम्या-

“नोटबंदीच्या संकटाचा विक्रम लॉकडाउननं मोडला, देशाला उपचार हवेत प्रचार नको”

राज्यात तीन पक्षांचं सरकार, कोण निर्णय घेतंय हे त्यांचं त्यांनाच कळेना- रावसाहेब दानवे

मुंबईत एकाच दिवशी चार पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू!

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here