नवजात बाळाच्या शस्त्रक्रियेसाठी वाढदिवसादिनी आदित्य ठाकरेंकडून ‘लाख’मोलाची मदत!

[ad_1]

मुंबई |  आपल्या वाढदिवसादिनी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रगल्भता आणि संवेदनशीलता दाखवत एका नवजात बाळाच्या शस्त्रक्रियेसाठी 1 लाख रूपयांची मदत केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या या कृतीची सोशल मीडियावर चर्चा केली जात असून त्यांचं यासाठी कौतुक होत आहे.

घनसोली परिसरात राहणाऱ्या अब्दुल अन्सारी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी एका बाळाचा जन्म झाला. परंतू अंसारी यांच्या बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉकेज व एक छिद्र असल्याचं निदान झालं होतं. ऐरोलीच्या महापालिका रुग्णालयात जन्मलेल्या या बाळाच्या जीवाला धोका असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

दरम्यानच्या काळात बाळाला मदत करावी अशी याचना अन्सारी कुटुंबीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. सोशल मीडियातून आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत ही बाब आली. त्यांनी लगेचच युवा सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत याबाबत माहिती घेतली आणि अन्सारी यांना एक लाख रुपयांची मदत केली.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी त्यांचा वाढदिवस अतिषय साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. होर्डिंग, हारतुरे तसंच इतर कोणताही अनावश्यक खर्च करू नका. गरजू लोकांना मदत करा, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

फळं आणि भाज्यांद्वारेही पसरु शकतो कोरोना; अशी घ्या काळजी

भारतीयांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ महिन्यापर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा प्रभाव!

महत्वाच्या बातम्या-

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसादिनी रोहित पवारांची खास फेसबुक पोस्ट…

स्मशानभूमीत काम करणाऱ्या लोकांसाठी प्रकाश आंबेडकरांची पीपीई कीटची मागणी

भारतात कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ, पार केला धक्कादायक आकडा

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here