[ad_1]
कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक वाढत चालला आहे. भारतात कोरोना बाधीत रूग्णांचा आकडा जवळपास ४ लाखांच्या घरात जाऊन पोहचला आहे. या बाधितांवर उपचार करण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडून काही औषधांच्या चाचण्या केल्या जात असताना, महाराष्ट्र सरकारने नुकताच एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे.

कोरोना विषाणूविरोधात प्रभावी ठरलेल्या रेमडेसीवीर औषधाची वैद्यकीय चाचणी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्वच १४ सरकारी वैद्यकिय महाविद्यालयांना या चाचण्या घेता येणार आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे प्रमुख डाॅ. तात्याराव लहाणे यांच्याकडून हे निर्देश देण्यात आले आहेत.

या औषधाची चाचणी घेण्यासाठी महाविद्यालयांच्या नीति समितीकडून मंजूरी मिळणं गरजेचं असणार आहे. समितीनं चाचणी घेण्यास संमती दिल्यावर, राज्य सरकारला Drug Controller General Of India च्या मदतीनं हे औषध महाविद्यालयांना उपलब्ध करून देणं शक्य होणार आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आलेख वाढत असताना सरकारनं घेतलेला हा निर्णय नक्कीच धाडसी म्हणावा लागेल.

आता या औषधांची चाचणी कशी केली जाणारा हा प्रश्न आपल्याला पडला असावा. समजा एखाद्या करोना बाधीत रूग्णाला तिव्र स्वरूपाची लक्षणं आढळून आली तर रूग्णाच्या नातेवाईकांच्या परवानगीनं संबंधीत रूग्णावर रेमडेसिवीर औषधाची चाचणी केली जाईल. राज्य सरकार व महाविद्यालय यांच्या समन्वयातून ही सोय लवकरच उपलब्ध होणार आहे.

बिडीआर फार्मा व हेटेरीयो या औषध उत्पादन कंपन्यांनी कसलंही शुल्क न आकारता रेमडेसीवीर सरकारला मोफत पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यापुढील टप्प्यात रेमडेसीवर औषधांची अतिरिक्त गरज भागवण्यासाठी बांग्लादेशच्या बॅक्सिम्को कंपनीची मदत घेतली जाईल.

महाराष्ट्र सरकारनं राज्यातील कोरोना बाधीत रूग्णांना लवकर वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी कोव्हिड १९ टास्क फोर्सची निवड केली होती. या टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार, रेमडेसीवीर औषधांच्या ट्रायलसाठी येणारे सर्व कागदी अडथळ्यांना लवकर दूर केलं जावं. मुंबईतील कोरोना बाधीत रूग्णांना रेमडेसीवीर लवकर उपलब्ध व्हावं यासाठी सरकारनं प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे.

अमेरिकेतील ‘नॅशनल इन्सिट्युट ऑफ हेल्थ’कडून रेमडेसीवीर औषधावर नुकतंच भाष्य करण्यात आलं. संस्थेच्या संशोधनानुसार, या औषधामुळे श्वसनाचा कमी त्रास होत असलेल्या रूग्णांना बराच फायदा होऊ शकतो. याकाळात ऑक्सिजनची गरज नेहमीच्या तुलनेने जास्त असते. या औषधाच्या वापराने श्वसनात येणारा अडथळा दूर होऊ शकतो.

विशेष बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सल्लागार डाॅ. एंथनी फाॅसी यांनीही रेमडेसीवीर औषधाचं बरंच कौतुक केलं आहे. फाॅसी यांच्या मते, रेमडेसीवीर औषधाच्या मदतीनं कोरोना बाधीत रूग्ण लवकर बरे होत आहेत. या औषधाचा रूग्णांवर अगदी जादूसारखा प्रभाव पडत असल्याचं पहायला मिळालं आहे.

रेमडेसीवर हे औषध उत्तम प्रकारंच विषाणूरोधी (अॅन्टीव्हायरल) मानलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेच्या चाचणी परीक्षेत हे कोव्हिड-19 विषाणूच्या विरोधातील प्रभावी औषध ठरलं आहे. 2014 साली आफ्रिकेत पसरलेल्या इबोला व्हायरसच्या काळात या औषधाचा सर्वप्रथम वापर करण्यात आला होता.
ट्रेंडिंग बातम्या-
संवेदनशील छत्रपती; बळीराजाचं दुःख न पाहवल्याने राजेंनी स्वतः तिफन ओढली! पाहा व्ही़डिओ
सरकारचा खासगी लॅबला दणका; कोरोना चाचणीच्या शुल्कासंदर्भात घेतला मोठा निर्णय
महत्वाच्या बातम्या-
आदित्य ठाकरेंवर अजिंक्य राहणेचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाला…
जमीन विकत घेऊन फक्त गरजूंसाठी अन्नधान्य पिकवण्याचा विचार- हरभजन सिंह
राज्यात तीन पक्षांचं सरकार, कोण निर्णय घेतंय हे त्यांचं त्यांनाच कळेना- रावसाहेब दानवे
[ad_2]
Source link






