पुण्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू; वाचा काय सुरू काय बंद

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता डेल्टा आणि डेल्टा प्लस या कोरोना विषाणूने सर्वांची चिंता वाढवली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता पुणे महानगरपालिकेने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार आता पुणे महानगरपालिका क्षेत्रात लेवल ३ चे निर्बंध लागू असणार आहेत हे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित केले आहेत.

 

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवांमधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. तर शनिवार आणि रविवार पूर्णत: बंद राहतील.
पुण्यातील मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णपणे बंद राहतील.
रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवाररविवार फक्त पार्सल सेवा ११ पर्यंत.
उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.
खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत.
अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालये शंभर टक्के क्षमतेने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here