जय ओबीसी : नागपूर येथील भाजपच्या चक्काजाम आंदोलनात युवक काँग्रेसचा बॅनर ठरला लक्षवेधी

नागपूर (प्रतिनिधी) – राज्यातील विविध जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाकरिता भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन सुरु आहे. मात्र येथील व्हरायटी चौकात भाजपाच्या आंदोलनात युवक काँग्रेसचा बॅनर लक्षवेधी ठरत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील व्हरायटी चौकात लावलेल्या भाजपच्या मोठ्या बॅनरसमोर युवक काँग्रेसनं स्वत:चा बॅनर लावला. विशेष म्हणजे या बॅनरवर काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो नव्हते. तर भाजपमधील आजी-माजी ओबीसी नेत्यांचे फोटो होते. त्याखाली जय ओबीसी अशी घोषणादेखील होती.

आपल्या बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो लावून युवक काँग्रेसंनं अप्रत्यक्षपणे भाजपमधील ओबीसी नेत्यांचे प्रश्न उपस्थित केले. पोलिसांनी हे बॅनर जप्त केले. या बॅनरवर भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे, भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे व सुधाकर कोहळे यांचे फोटो होते. जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो कुर्बानी अशी एक ओळदेखील बॅनरवर होती. युवक काँग्रेसचा हा बॅनर भाजपच्या आंदोलनात लक्षवेधी ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here