नागपूर येथे महिला होमगार्डचा विनयभंग करणारा पीएसआय निलंबित

नागपूर (प्रतिनिधी) – एका महिला होमगार्डचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील एका पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

यशोधरानगर पोलीस ठाण्यात होमगार्ड पदावर कार्यरत असणाऱ्या महिलेनं हे आरोप केले आहेत. याबाबतची तक्रार पोलीस आयुक्तांकडे देण्यात आली आहे. आयुक्तांनी विनयभंगाची तक्रार गांभीर्यानं घेतली असून संबंधित पोलीस निरीक्षकाचं निलंबन केलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

अशोक मेश्राम असं संशयित आरोपी पोलीस निरीक्षकाचं नाव असून ते नागपूरमधील यशोधरा नगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी पीडित होमगार्ड महिलेनं यशोधरा नगर पोलीस ठाण्यातच हा गुन्हा दाखल केला आहे. विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मेश्रामांवर निलंबनाची कारवाई केली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here