पुणे विशेष (प्रतिनिधी शिवप्रसाद जठार) – शुक्रवार (दि.२५) पर्यावरण व पर्यटनमंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त वडगावशेरी मतदार संघ युवासेना समन्वयक शिवप्रसाद जठार व शिवसेनेचे समन्वयक राजू भाऊ सावंत, संघटक शंकर संगम यांच्या प्रयत्नातून वडगावशेरी मतदारसंघातील गरीब व गरजू नागरिकांसाठी पुणे मनपाच्या शहरी गरीब योजने अंतर्गत आरोग्य विमा कार्डचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अजय बापू भोसले व युवासेना महाराष्ट्र राज्य सह सचिव किरण भाऊ साळी यांच्या हस्ते आरोग्य विमा कार्डचे वाटप करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिवसेना संघटक विनोद करताल यांनी केले.
याप्रसंगी शिवसेनेचे उपशहर प्रमुख आनंद गोयल, शहर समन्वयक सुनील जाधव, मा. नगरसेवक सचिन भगत, अडव्होकेट सतीशजी मुळीक, विभाग प्रमुख आबा खलसे, अनिल टिंगरे, शिवाजी वडघुले, विनोद परहाड, राहुल शेडगे, प्रदीप ढोकले, सुरेश आल्हाट, विकास नवले, प्रशांत साळुंके, स्वप्नील घाडगे, रिंकू शर्मा, मोहमद शेख, रमजान सय्यद, विनोद चिंचकर, अविनाश सूक्रे, कुणाल खुळे, युवासेना गणेश देवकर, राकेश कांबळे, नवनाथ सुरवसे आदी उपस्थित होते.






