इगतपुरीतील रिसॉर्टमधील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, ‘बिग बॉस’ फेम महिलेचा समावेश

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : इगतपुरीत रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर शनिवारी रात्री नाशिक ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली. छापेमारीत चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या चार महिला सापडल्या. यात बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेचाही समावेश आहे.

इगतपुरीमध्ये मानस रिसॉर्टच्या हद्दीतील स्काय ताज विला या बंगल्यावर छापा टाकण्यात आला होता. शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी टीमसोबत धाड टाकली होती. गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे ही कार्यवाही करण्यात आली.

स्काय ताज विलामध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याचं छापेमारी समजलं. या पार्टीत मनोरंजन विश्वातील चार महिला सापडल्या. बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतलेल्या एका महिलेचाही यात समावेश आहे. एकूण २२ जणांना नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी ताब्यात घेतलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here