टी २० वर्ल्ड कप भारताबाहेर होणार

सचिव जय शहा यांचे शिक्कामोर्तब

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणारा टी२० वर्ल्ड कप भारताच्या बाहेर होणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शहा यांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा देशाबाहेर आयोजित होऊ शकते, असं त्यांनी सांगितले. यापूर्वी आयपीएल २०२१ स्पर्धा कोरोनाच्या उद्रेकामुळे स्थगित करावी लागली होती. त्यानंतर या स्पर्धेचा दुसरा टप्पा आता यूएईमध्ये होणार आहे.

बीसीसीआय सचिवांनी एएनआय ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितले की, “आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये घेतली जाऊ शकते. त्याबाबतचा निर्णय आम्ही लवकरच घेणार आहोत.” टी २० वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आयसीसीनं बीसीसीआयला जून अखेरपर्यंत मूदत दिली आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, टी-२० वर्ल्ड कप दोन टप्प्यांत खेळवला जाणार आहे. पहिला टप्पा हा यूएईमध्ये आणि ओमानमध्ये आयोजित केला जाणार आहे. रिपोर्टनुसार, पहिल्या राऊंडमध्ये १ ते १२ मॅचेस होतील ज्यामध्ये ८ टीम्समध्ये मॅच होतील. या ८ टीम्सपैकी ४ टीम्स सुपर १२ साठी क्वॉलिफाय होतील.

सुपर १२मध्ये एकूण ३० मॅचेस होतील. २४ ऑक्टोबर पासून या मॅचेसची सुरुवात होईल. सुपर १२ मधील टीम्सला ६-६ अशा दोन गटात विभागले जाईल. या लढती यूएईतील दुबई, अबूधाबी आणि शारजाह येथे खेळवल्या जातील. सुपर १२ नंतर ३ ‘प्ले ऑफ’ मॅच खेळवल्या जातील. यामध्ये २ सेमीफायनल आणि फायनल मॅचचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here