रत्नागिरी – सोगावकर : डेल्टा प्लस व्हेरियंटचे २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळल्यानं खळबळ माजली होती. मात्र, आता एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेली ३ बालके बरे होऊन घरी परतले आहेत.
रत्नागिरीत डेल्टा प्लस व्हेरियंटची ९ रुग्ण आढळले होते. त्यात या तीन बालकांचादेखील समावेश होता. या बालकांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या बालकांची वये तीन, चार व सहा अशी असून हे तिघंही संगमेश्वर तालुक्यातील आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी डेल्टा प्लसची लागण झालेल्या रुग्णाचा राज्यात पहिला मृत्यू झाला होता. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे मृत्यू झालेली व्यक्ती ८० वर्षांची होती. या व्यक्तीला इतरही काही आजार होते अशी माहिती मिळत आहे.






