मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : कोकण हे निसर्गसौंदर्याची खाण आहे. हे कोकण म्हणजे स्वातंत्र्याचा साक्षीदार असही म्हटलं जातं. कोकणात बऱ्याचशा गोष्टी घडून गेल्या, ज्या इतिहासामध्ये कोरल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे काही अशा घटना देखील घडल्या आहेत ज्या माणसाच्या काळजाचे ठोके चुकवतात. त्यातीलच एक घटना तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नांदोस या गावी घडली आणि एकच भितीची लाट पसरली. याच नांदोस गावी मानवी जीवनाचा काही तरुणांकडून निर्घृणपणे शेवट केला जात होता हा विषय जितका भीतीदायक होता तितकाच आख्या भारतामध्ये चर्चेचा देखील ठरत होता. त्यावेळी नेमका रक्तरंजित थरार काय घडला…? यावरती एक दृष्टिक्षेप टाकणारा हिंदी चित्रपट लवकरच शर्विल फिल्म प्रोडक्शन च्या माध्यमातून तुमच्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे नांदोस The Rain Of Blooded Money…!
या चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक राजेश मापुस्कर. हा चित्रपट प्रशांत पवार यांच्या लेखणीतून जन्मास आला ते लिखाण कॅमेरा च्या माध्यमातून लोकांपर्यंत उत्तम प्रकारे पोहोचवण्यासाठी दिग्दर्शनाची मुख्य भूमिका ओंकार सुनील पंडित यांनी अत्यंत चोख पणे पार पाडलेली आहे सह दिग्दर्शक म्हणून नंदू जुवेकर हे आपल्याला पाहायला मिळतील चित्रपटाचे आर्ट डिपार्टमेंट हे रोहित नागले आणि टीम यांनी सांभाळले आहे चित्रीकरणाची पूर्ण जबाबदारी ही उद्धव बोरसुतकर आणि त्यांच्या टीमने बजावली आहे एडिटिंग चे पूर्ण काम ओमकार पंडीत आणि नेहा शर्मा यांनी केले आहे मॅनेजमेंट हेड साईप्रसाद शिरसेकर आणि टीम तसेच लाईट डिपार्टमेंट किरण राठोड आणि स्वप्नील धनावडे यांनी केले. तसेच सहयोग थिएटर्स मुंबई. सो$हम प्रकाशित रत्नागिरी.. दिग्दर्शक.. व संस्थापक.. *श्री बाळकृष्ण केशव घवाळी सर आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला या चित्रपटाच्या शुभारंभ पासून ते चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत मदत केली त्या सर्वांचे शर्विल फिल्म प्रोडक्शन च्या वतीने अगदी मनापासून विशेष आभार.
या चित्रपटामध्ये कलाकार मनोज भिसे, सुजित मेस्त्री, अमोल मयेकर, नंदू जुवेकर, चंदू कांबळे, ऋषिकेश शिंदे, गणेश राऊत, सुभाष शिवलकर, प्रितेश पंडये, ऋषिकेश शितुत, स्वप्नील धनावडे, दीपक कांबळी, ऋषिकेश सोनवणे, शुभम जाधव, शुभम शिवलकर, सुप्रीती शिवलकर, श्रुतिका कदम, ऐश्वर्या कांबळी, जान्हवी तांबट, वेदा शेट्ये, सावली मयेकर हे आपणास मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बनलेला पहिला हिंदी चित्रपट नांदोस The Rain Of Blooded Money…!






