गोव्यातील ड्रग्ज पेडलर एनसीबीच्या जाळ्यात

पणजी (प्रतिनिधी प्रविण म्हापसे) : गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना आणि नशेबाजांना ड्रग्ज पुरवणाऱ्यांपैकी फर्नांडिस, ओनायेका ईगीके, चिडी ओसीता ओकोनवो ऊर्फ बेंजामिन यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)ने अटक केली. ओनायेका हा पेडलरला ड्रग्ज देण्यापूर्वी पासवर्ड विचारत असायचा. पासवर्डनंतर तो ड्रग्ज देत असल्याचे तपासात समोर आले.

झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. उत्तर गोव्यातील अंजुना येथे रोकी फर्नांडिस याच्याकडून एनसीबीने 340 ग्रॅम नेपाळी चरस जप्त केले. त्याच्या चौकशीत चिडी ओशिता ओकॉनवो ऊर्फ बेंजामिनचे नाव समोर आले. त्याच्याकडून एनसीबीने एमडीएमएच्या २३ टॅबलेट जप्त केल्या आहेत.

रोकी हा उत्तर गोव्यातील मुख्य पेडलर आहे. ड्रग्ज तस्करीप्रकरणी एनसीबीने रोकीला अटक केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर रोकी हा पुन्हा ड्रग्जच्या धंद्यात सक्रिय झाला. रोकीचे उत्तर गोव्यात एक आईस्क्रीम पार्लर आहे. त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये येणाऱ्या नशेबाजांना रोकी हा ड्रग्ज विकायचा. ड्रग्जचे पैसे तो ऑनलाइन ई वॉलेटवरून घेत असायचा. रोकी हा पर्यटकांनादेखील ड्रग्ज पुरवत होता.

एनसीबीने उत्तर गोव्यातून ओनायका ईगीके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडूनर २० ब्लॉट्स एलएसडी जप्त केले आहेत. ओनायका हा ड्रग्ज देण्यापूर्वी पासवर्ड विचारत असायचा. पोलीस किंवा एनसीबीने पकडू नये म्हणून तो ड्रग्ज घेणाऱ्या ग्राहकांना ठिकाणे बदलून भेटायला बोलवायचा. ओनायकाविरोधात दोन वर्षांपूर्वी ड्रग तस्करीचा गुन्हा दाखल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here