मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : राज्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे २९,२०० पात्र मानधनधारकांच्या खात्यात पुढील आठवड्यात एप्रिल, मे व जून पर्यंतचे मानधन जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले आहे.
श्री देशमुख यांनी पुढे सांगितले की, एप्रिल मे व जून या तीन महिन्यांचे मानधन अदा करण्यात येत असून यासाठी २२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी राज्य शासनाकडून ही योजना सन १९५५ पासून राबवण्यात येते. अलीकडेच या मानधनधारकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून सद्यस्थितीत श्रेणीनिहाय (अ श्रेणी रुपये 3150, ब श्रेणी रुपये 2700, क श्रेणी रुपये 2250 ) मानधन दरमहा अदा करण्यात येते.






