एलआयसी हाउसिंग फायनान्सने शुक्रवारी गृहकर्ज दरात केली कपात

येत्या ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत हा विशेष गृहकर्ज दर लागू राहील

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : गृहकर्ज क्षेत्रातील एलआयसी हाउसिंग फायनान्सने शुक्रवारी गृहकर्ज दरात कपात केली आहे. ५० लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याजदर ६.६६ टक्के करण्यात आला आहे. येत्या ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत हा विशेष गृहकर्ज दर लागू राहील, असे कंपने म्हटलं आहे. गृहकर्जाचा हा सर्वात कमी व्याजदर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

एलआयसी हाउसिंग फायनान्सने याबाबत आज प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. त्यानुसार गृह कर्जाचा हा विशेष व्याजदर प्राप्त करण्यासाठी ग्राहकाचे सिबिल रेकॉर्ड ग्राह्य धरले जाणार आहे. सिबिलच्या आधारे कर्जदाराची पत क्षमता किती आहे त्यावरून हा विशेष व्याजदर दिला जाईल, असे कंपनीने म्हटलं आहे.

करोना संकटकाळात अनेकांचे गृहस्वप्न अपूर्ण राहिले. या संकट काळात व्याजदर कमी केल्याने गृह खरेदीच्या बाजारपेठेला चालना मिळेल आणि इच्छुकांना आपले गृहस्वप्न पूर्ण करता येईल, अशी कंपनीची अपेक्षा असल्याचे ‘एलआयसी हाउसिंग फायनान्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथ गौड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here