जुलै महिन्यात १५ दिवस विविध सण उत्सवानिमित्त बँका राहतील बंद

नवी दिल्ली : सार्वजनिक सुट्टी आणि साप्ताहिक रजा यामुळे जुलै महिन्यात तब्बल १५ दिवस बँका बंद राहणार आहेत. गैरसोय टाळून बँकांची कामे उरकण्यासाठी ग्राहकांना नियोजन करावे लागणार आहे. महाराष्ट्रात मात्र २१ जुलै रोजी ईद ची बँकांनी सुट्टी असेल आणि दुसरा आणि चौथा शनिवार बँका बंद राहतील.

जुलैमध्ये राष्ट्रीय सुट्टी, स्थानिक पातळीवरील सुट्टी तसेच दुसरा आणि चौथा शनिवार असे मिळून १५ दिवस बँका बंद राहणार आहेत.त्यापैकी ४ जुलै रविवार, १० आणि ११ जुलै दुसरा शनिवार आणि रविवार रोजी बँका बंद राहतील. सोमवार १२ जुलै रोजी रथ यात्रेनिमित्त भुवनेशवर आणि इम्फाळमध्ये बँका बंद राहतील. तर इतरत्र नेहमीप्रमाणे बँकांचे कामकाज सुरु राहणार आहे. त्यानंतर भानू जयंती निमित्त मंगळवार १३ जुलै आणि १४ जुलै रोजी केवळ गंगटोकमधील बँकांना सार्वजनिक सुट्टी राहील.

१७ जुलै रोजी अगरतळा आणि शिलॉंगमध्ये बँकांना सुट्टी राहील. १९ जुलै रोजी गंगटोकमध्ये स्थानिक उत्सवानिमित्त बँकांना सुट्टी राहील. २० जुलै रोजी बकरी ईद निमित जम्मू, कोची, तिरुवनंतपूरम आणि श्रीनगरमध्ये बँकाना सुट्टी असेल. २१ जुलै रोजी देशभरात ईद निमित्त बँकांना राष्ट्रीय सुट्टी असेल. ३१ जुलै शनिवारी केरपुजे निमित्त अगरतळामध्ये बँकांना सुट्टी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here