शिंदखेडा शिवसेनातर्फे जिल्हापरिषद मराठी शाळेत लसीकरण संपन्न

१०० नागरिकांनी घेतला लाभ

शिंदखेडा (प्रतिनिधी) : येथील शिवसेना शिंदखेडा शहराततर्फे जिल्हा परिषद मराठी शाळा क्र.६ मध्ये कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता नागरिकांना लस घेणे सुलभ व्हावे या हेतूने, धुळे ग्रामीण शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली माळीवाडा व जनता नगर भागातील रहिवाशांसाठी लसीकरण शिबिर संपन्न झाले.

यासाठी जिल्हा व तालुका आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून शहरातील रहिवाशांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात आली. या शिबीराचा १०० नागरिकांनी लाभ घेतला.

शिबीराच्या यशस्वीतेसाठी शिवसेना तालुका संघटक गणेश परदेशी, शहरप्रमुख संतोष देसले, उपशहरप्रमुख किशोर पाटील, युवासेना शहरप्रमुख योगेश माळी, नाना पाहाडी, तालुका समन्वयक विनायक पवार, भुषण परदेशी, दिनेश परदेशी, किशोर माळी, कुणाल जाधव, वासुदेव माळी, राहुल राजपूत, नारायण माळी, ईश्वर जाधव या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले. तर तालुका आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here