अंदोरी येथून राजुरीला विज पुरवठ्यास विरोध

अंदोरी ग्रामस्थांचे विज कंपनी कार्यालया समोर उपोषण सुरू

धाराशिव (जिल्हा प्रातिनिधी सुरेश बागडे) : राजुरी येथील शेतकऱ्या साठी अंदोरी येथील ३३ केव्ही विद्युत उप केंद्रातून विज पुरवठा करू नये या मागणी साठी अंदोरी , पाचपिंपळा , कुंभेफळ, जाकेपिंपरी येथील शेतकऱ्यांच्या वतीने दि १ जुलै रोजी पासुन विज वितरणच्या परंडा कार्यालया समोर उपोषण सुरू करण्यात आले आहे .

शेतकऱ्यांच्या वतीने विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता उस्मानाबाद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राजुरी येथे जवळा ( निजाम ) आंतरगाव , परंडा येथून पुर्वी पासुन विज पुरवठा होत असताना राजकीय दबाव टाकुन अंदोरी येथून विज पुरवठा जोडणीचे प्रयत्न सुरू असल्याने अंदोरी येथील शेतकऱ्यावर अन्याय होत आहे .

निवेदनात पुढे म्हटले आहे की लाईन जोडणीचे काम खासापुरी धरणाच्या बुडीत शेत्रातून होत असल्याने भविष्यात वित्त व जिवीत हानी होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे .

अंदोरी येथून राजुरी साठी विज जोडण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी शेतक्यांच्या वतीने कार्यकारी अभियंता यांच्या कडे करण्यात आली आहे निवेदनावर ईश्वर उमाप, भाऊसाहेब बारसकर, पांडूरंग उमाप , सुरज बारसकर, रामलींग बासकर , नवनाथ लांडगे , महादेव बासकर , देवराव पवार , शहाजी बारसकर, समाधान बारसकर, दिलीप बारसकर, सुरेश बारसकर, दत्तात्रय बारसकर, विनोद बारसकर , शहाजी लांडगे , बिभीषण उमाप, तुषार बारसकर, धनाजी बारसकर आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत .

राजुरीच्या शेतकऱ्या साठी अंदोरीच्या ३३ केव्ही विज उप केंद्रातून विज पुरवठा करावा या मागणी साठी राजुरी येथील शेतकऱ्यांनी विज वितरण कंपणीच्या परंडा कार्यालया समोर अंदोलन केल्याने दि २ जुलै पर्यंत पोलिस बंदोबस्त घेऊन विज पुरवठयाचे काम सुरू करू असे लेखी अश्वासन अंदोलन कर्त्यांना देण्यात आले होते .

पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या मार्ग दर्शनाखाली सहाय्यक पो उप निरिक्षक बी.बी जगताप , पो.कॉ विशाल खोसे , पो.कॉ बळीराम शिंदे यांनी अंदोलन स्थळी बंदोवस्त लावण्यात आला आहे या वेळी अंदोरीचे पोलिस पाटील अंगद बारसकर हजर होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here