जळगाव (क्राइम रिपोर्टर अशोक फुलपगारे) : राष्ट्रीय सेवेसाठी अथक परिश्रम घेत असलेल्या डॉक्टरांच्या अमूल्य योगदानाची ओळख पटविण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. जगातील विविध देशांकडून डॉक्टरांचा दिवस वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. भारतातील महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त भारतात दरवर्षी १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. ज्यांनी आपल्या गरजेच्या वेळी निःस्वार्थपणे आपल्याला मदत केली आणि रूग्णाच्या आरोग्यासाठी अथक परिश्रम केले, अशा सर्व डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, मंगेश चिवटे यांचा मार्गदर्शनाखाली आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव च्या वतीने डॉक्टर दिना निमित्त शासकीय वैद्यकीय रूग्णालय मोहाडी येथे डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. कोवीड काळात जिवाची पर्वा न करता अविरत रूग्णसेवेचे कार्या बद्दल सर्व डॉक्टरांचे आम्ही ऋणी आहोत. असे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष शहर समन्वयक जितेंद्र गवळी, भावेश ढाके यांनी डॉक्टरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. मोईज देशपांडे, आयुर्वेदीक वैद्यकीय निवासी अधिकारी RMO शल्य रोग तज्ञ डॉ.विद्या जंगले, डॉ.पायल, डॉ.हर्षा आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी मदत कक्षाचे सहकारी गणेश गुरव दिपक घ्यार चेतन परदेशी अतुल धनगर मोहीत येवले आदी उपस्थित होते
इनचार्ज सिस्टर धनगर मँडम, राठोड मँम महिला रूग्णालय मोहाडी कोविड सेंटर येथील स्टाफ. फार्मसिस्ट- धिरज राठोड, भाग्येश पाटील, हर्षाली ताई, वार्डबाॅय मुकादाम – चेतन परदेशी, दिपक घ्यार, समाधान पवार, अनिल पवार, सागर सोनवणे, दिपक नाईक, पवन शिरसाळे, रवी पाटील. आदी उपस्थित होते.






