औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना तिसऱ्या लाटेचा धोकाही दर्शवला आहे. अशातच राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे.
औरंगाबादमध्येही विकेंड लॉकडाऊन असतानाही रात्री १२ पर्यंत कव्वालीचा कार्यक्रम सुरु होता. धक्कादायक म्हणजे या कव्वालीच्या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलीलही देखील उपस्थित होते.
https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/1848920691933967/
या कव्वालीच्या कार्यक्रमाला शेकडोंची गर्दी जमली होती. विशेष म्हणजे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील देखील या कार्यक्रमात रात्री उशिरापर्यंत सहभागी होते.दौलताबाद रस्त्यावरील रिसॉर्टमध्ये शनिवारी मध्यरात्री पर्यंत हा कार्यक्रम सुरु होता. खासदार जलील यांचा कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.






