राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने आपण भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगितल्याचा दावा सलगर यांनी केला होता.

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्यावरुन पडळकरांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. याविषयी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणजे धनगर समाज नाही, असं प्रत्युत्तर सक्षणा सलगर यांनी दिलं होतं. त्यानंतर ‘तुझी इज्जत लुटतो’ अशी धमकी देणारा फोन सलगर यांना आला होता.

सलगर यांनी धमकी देणाऱ्याचा फोन नंबर सोशल मीडियावर शेअर करत शनिवारी त्याविषयी माहिती दिली होती. ‘मला आज सायंकाळी 06:14 वा. 9922300038 या नंबरवरुन फोनवरुन कॉल आला होता. ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ. गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता.’ असं ट्वीट सलगर यांनी केलं होतं. उस्मानाबाद पोलिस यासंबंधी तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here