पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन फक्त दोनच दिवसांचं घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

५ आणि ६ जुलै रोजी हे अधिवेशन मुंबईत पार पडणार आहे. विरोधीपक्षाने थेट आक्रमक भूमिका घेतल्यानं आता हे अधिवेशन मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनाप्रमाणे अधिक गाजण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सरकार मुख्य ३ प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हे अधिवेशन फक्त २ दिवसांचं असल्यानं अधिवेशनावर चर्चा होणार की नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अधिवेशन चालू द्यावा, अशी मागणी केली होती. तर अधिवेशनाच्या आधीपासूनच विरोधीपक्ष आक्रमक झालेला दिसत आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या नेमणूकीवरून देखील गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here