भारती विद्यापीठ आय एम ई डी मध्ये आंतरराष्ट्रीय परिषद

अ.भा. तंत्र परिषदेच्या सहकार्याने ८ जुलै पासून आयोजन

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी )तर्फे अखिल भारतीय तंत्र परिषदेच्या सहकार्याने ८ ते १० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे .

‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इमर्जिंग मार्केट्स ‘ असे या परिषदेचे नाव आहे. भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी ) चे संचालक आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ सचिन वेर्णेकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ऑस्ट्रेलिया,दक्षिण आफ्रिका ,दक्षिण कोरिया,कुवैत,रोम ,व्हेगन ,स्वीडन ,मलेशिया अशा एकूण १४ देशांचे प्रतिनिधी,शिक्षण तज्ज्ञ,संशोधक,विद्यार्थी या परिषदेत सहभागी होणार आहेत.

डॉ सचिन वेर्णेकर हे या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविणार असून डॉ श्याम शुक्ला आणि डॉ श्रद्धा वेर्णेकर या समन्वयक आहेत. मार्केटिंग क्षेत्रातील नवसंकल्पना आणि नवनेतृत्व यावरील चर्चेवर परिषदेत भर देण्यात येणार आहे. उगवत्या बाजारपेठेतील बिझनेस इकॉनॉमिक्स,टेक्निकल अस्पेक्ट्स,आंत्रप्रेनरशिप विषयक पैलूंवर चर्चा होणार आहे . संशोधनपर निबंध ,केस स्टडीज या परिषदेत मांडल्या जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here