महापौर, उपमहापौर, आयुक्त, नगरसेवक अॅड. पोकळेंच्या यांची उपस्थिती
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या ‘क्रेडाई’ जळगाव तसेच क्रेडाई वूमन विंगतर्फे शहरातील कानळदा रोड परिसरातील केसी पार्क भागात आज सोमवार, दि. 5 जुलै 2021 रोजी सकाळी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी व प्रभाग क्र. 1 चे नगरसेवक दिलीप पोकळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
‘क्रेडाई’ जळगावचे माजी अध्यक्ष श्री.प्रवीण खडके यांनी यांनी सर्व वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘क्रेडाई’ जळगावतर्फे सन 2021-22 या वर्षात 500 वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतला आहे.

या वृक्ष लागवडीच्या पहिल्या टप्प्याचा आज प्रारंभ करण्यात आला. ‘क्रेडाई’ जळगावचे अध्यक्ष हातीमभाई, सचिव श्री.दीपक सराफ, ‘क्रेडाई’ महाराष्ट्चे श्री.अनिश शहा, ‘क्रेडाई’ वूमन विंगच्या समन्वयिका आर्किटेक्ट सुचिता चौधरी, सौ.यामिनी शहा, सौ.निकिता खडके, सौ. रूपाली चौधरी, ‘क्रेडाई’चे सर्व सदस्य व परिसरातील पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






