नवी दिल्ली : आगामी टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी बॉक्सिंगपटू मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांना २०० सदस्यीय भारतीय पथकाचे ध्वजवाहक बनवण्यात आले आहे. सहा वेळा विश्वविजेती असलेली मेरी कोम तिच्या दुसर्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार आहे.
Boxer MC Mary Kom & hockey player Manpreet Singh to be flag bearers of Indian contingent at Tokyo Olympics opening ceremony; wrestler Bajrang Punia to be flag bearer of the contingent at the closing ceremony
(file photos) pic.twitter.com/dciT4EBS0U
— ANI (@ANI) July 5, 2021
२०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मेरी पात्र ठरली नव्हती. मात्र २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकले. २०१४च्या आशियाई खेळांमध्ये तिने सुवर्ण, तर २०२०मध्ये रौप्यपदक जिंकले होते.
२८ वर्षीय मनप्रीत त्याच्या तिसर्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार आहे. २०१६पासून तो भारतीय पुरुष संघाचा कर्णधार आहे. २०१४च्या इंचेऑन आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन रौप्यपदक जिंकणार्या तो भारतीय संघाचा सदस्य होता.चॅम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनिया ८ ऑगस्टला होणाऱ्या समापन समारंभासाठी भारतीय पथकाचा ध्वजवाहक असणार आहे.






