मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. ०५ जुलै २०२१ ते ०३ ऑगस्ट २०२१ या कालावधी ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी शहाजी उमाप यांनी हे आदेश निर्गमित केले असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कलम १८८ भा.दं.वि. १८६० नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.






