पुण्यात महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शहर पोलिस दलाच्या विशेष शाखेत नेमणुकीस असलेल्या महिला पोलिसाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. ५) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली.

श्रध्दा शिवाजीराव जायभाये (२८, सध्या रा. कावेरीनगर पोलिस लाईन, बिल्डींग नं. २१, रूम नं. ४, वाकड, पुणे. मुळ रा. शेगाव) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे.

वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रध्दा जायभाये या विवाहीत असून त्यांचे पती नेवीमध्ये नोकरीस आहेत. सध्या ते केरळमध्ये आहेत. दरम्यान, दोन दिवसांपासून श्रध्दा यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्या एका मैत्रीणीने वाकड पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या वाकड पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून श्रध्दा यांचा मृतदेह बाहेर काढला. श्रद्धा यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here