शहादा येथे ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना

शहादा (प्रतिनिधी) : रविवार दि. ४/६/२१ सकाळी ठीक ११वाजता खोक्राळे ता. जि. नंदुरबार येथे नविन जेष्ठ नागरिक संघ सद्गुरु जोगमहाराज जेष्ठ नागरिक संघ व संत मिराबाई महीला जेष्ठ नागरिक संघ यां दोन संघांचा स्थापनेचा कार्यक्रम जेष्ठ नागरिक महासंघ फेस्काॅम खांदेश प्रादेशिक विभाग धुळे चे सचिव श्री. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.

यां वेळी फेस्काॅम खांदेश प्रादेशिक विभाग धुळे चे संचालक श्री. केडीगिरासे उपस्थित होते. प्रथम खरा तो एकची धर्म ही सानेगुरुजींची प्रार्थना म्हटली नंतर सार्वजनिक श्रध्दांजली वाहण्यात आली. संघांचे अध्यक्ष श्री. जयसिंग चंद्रसिंग गिरासे यांनी प्रस्तावना मांडली. केडीगिरासे यांनी जेष्ठ नागरिक संघ स्थापनेचा उध्देश व कार्य यांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बी. एन. पाटील यांनी जेष्ठ नागरिकांची, व्याख्या, कार्य, एकत्रीत एकसंघ राहाणे संघा मार्फत होणारे फायदे, तसेच राज्य व केंद्र शासनांकडून विविध योजनांपासून मिळणारे लाभ आणि उपयोग, उपभोगता (एसटीबस, रेल्वे, दवाखाने) यांबाबत सखोल मार्गदर्शन केले. उपस्थितांचे प्रश्नांची उत्तरं दिलीत. यांवेळी महीला व पुरुषांसह जवळपास ४० जेष्ठांची उपस्थिती होती. येथे पसायदान म्हटल्या नंतर महीला संघाच्या सचिव जयश्री जितेंद्र गिरासे यांनी आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here