ना.बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) : आज सोमवार दि 05/07/2021रोजी नामदार बच्चूभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त शिव पर्वत ट्रॅक्टर शोरूम देवळा येथे प्रहार संघटनेचे वतीने भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी शिवचरीत्रकार व्याख्याते यशवंतजी गोसावी यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.प्रमुख पाहुणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, भाउसाहेब पगार शिवसंग्रामचे यूवा प्रदेश अध्यक्ष उदय कुमार आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारीनी सदस्य, योगेश आबा आहेर,जितूआण्णा आहेर,ता. कॄ.अधिकारी सचिन देवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष मांडगे, गटविकास अधिकारी राजेश देशमुख सहाय्यक निबंधक कार्यालयातील वरिष्ठ सहकार अधिकारी देशमुख , कांदा उत्पादक संघटनेचे जयदीप भदाणे आदी उपस्थित होते.

blood-donatation

मा.उपजिल्हाध्यक्ष कृष्णा भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जि संघटक भाऊसाहेब मोरे, दशरथ पुरकर, नानाजी आहेर,बागलाण तालुकाध्यक्ष तुषार खैरनार, राहूल सोनवणे,देवळा तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर, उपाध्यक्ष हरीसिंग ठोके, युवा संघटना देवळा तालुकाध्यक्ष बापूसाहेब देवरे, देवळा शहर अध्यक्ष हितेंद्र आहेर, उपशहराध्यक्ष संकेत जाधव,अपंग तालुकाध्यक्ष बाळू बैरागी उपाध्यक्ष अर्जुन देवरे,अंतू पवार, पंकज सुर्यवंशी आदी उपस्थित होते. उद्धाघाटन प्रसंगी युवा क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यशवंत गोसावी , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले ना ,बच्छु कडु यांच्या ५१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बच्छु कडु यांच्या कार्याचा गौरव म्हणून कीमान ५१ रक्त दांत्यानी रक्तदान करून वाढदिवस साजरा करावा असे आवाहन केले त्याला देवळा तालुक्यातील जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे प्रतिनिधी दिपक जाधव मेट्रो ब्लड बँक सिव्हिल हॉस्पिटल नाशिक डॉ.लहाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.शेवटी प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष क्रुष्णा जाधव यांनी शिबिर यशस्वी झाले पण त्याबद्दल आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here