वीज मीटर कापल्याच्या रागातून महिलेची महावितरण कर्मचाऱ्यांवर दादागिरी

चक्क मीटररूममध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना आत डांबून ठेवून बाहेररून टाळे ठोकले

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : वीज मीटर कापल्याच्या रागातून महिलेने महावितरण कर्मचाऱ्यांवर दादागिरी केली. त्यांना मीटररूममध्येच लॉक करून डांबून ठेवल्याचा प्रकार विरारमध्ये घडला आहे.

विरार पूर्वेच्या पाचपायरी परिसरातील गोविंद एकता सोसायटीत महावितरणाचे कर्मचारी बिल न भरलेल्या मीटरवर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यांचा एका महिलेशी वाद झाला. महिलेने आपले थकीत वीजबील भरले असतानाही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तिची वीजमीटर कापण्यास सुरुवात केली. यानंतर महिलेचा संताप अनावर झाला. तिने चक्क मीटररूममध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना आत डांबून ठेवून बाहेररून टाळे ठोकले.

हे कर्मचारी लॉक खोलण्यासाठी बऱ्याच विनवण्या करीत होते. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर सोसायटीच्या इतर रहिवाशांनी महिलेची समजूत घालून २०-२५ मनिटांनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. महिला व कर्मचाऱ्यांची समजूत घातल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here