सिन्नर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सिन्नर नगरपालिका कंत्राटी सफाई कामगार सेना यांनी राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर नगरपालिकेला कंत्राटी सफाई कामगार सेना यांचे कायदेशीर सल्लागार व महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर महीला तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट भाग्यश्री सचीन ओझा यांनी दिलेल्या निवेदनात मान देवून सिन्नर नगर पालिका मुख्य अधिकारी श्री. केदार व सिन्नर नगर पालिका दवाखाना अधिक्षक डॉ. प्रशांत खैरनार यांच्या विशेष सहकार्याने कंत्राटी सफाई कामगार यांचे ७०% लसीकरण शनिवारी (दि. ३) रोजी पुर्ण झाले.
त्याबद्दल सर्वप्रथम कामगार सेनेमार्फत सिन्नर नगर पालिका मुख्य अधिकारी श्री.केदार व सिन्नर नगर पालिका दवाखाना अधिक्षक डॉ. प्रशांत खैरनार यांचे आभार मानले त्यावेळेस मुख्यअधिकारी यांनी कोणती काळजी घ्यावयाची आहे याबद्दल मार्गदर्शन केले व डॉक्टरांनी कोवीड १९ काळात स्वत:चा जिव धोक्यामध्ये घालुन फ्रंट वॉरीयर म्हणुन काम करणाऱ्या कामगारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन व त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना कामगारांना फिजीकल डिस्टंसींगचे महत्व समजुन सांगीतले तसेच दि.३ कामगारांसह इतर १०० जणांचे लसीकरण पुर्ण झाले त्यावेळेस शुक्रवारी (दि.२) रोजी दिवसाअखेर सिन्नर नगरपालिका मध्ये ४८० लस शिल्लक होत्या त्या पैकी शनिवारी १०० लसीकरण पुर्ण झाल्यानंतर दिवसाअखेर ३८० लस शिल्लक होत्या. ३८० लस सोमवारी सकाळी शिल्लक होत्या. असे सांगितले व कामगारांना वाफेचे व मास्क वापरण्याचे महत्व समजावून सांगितले.
या लसीकरणाला सिन्नर नगर पालिका मुख्य अधिकारी श्री. केदार, सिन्नर नगर पालिका दवाखाना अधिक्षक डॉ. प्रशांत खैरनार, सिन्नर नगरपालिकेला कंत्राटी सफाई कामगार सेना यांचे कायदेशीर सल्लागार व महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर महीला तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट भाग्यश्री सचीन ओझा, सफाई कामगार ठेकेदार प्रशांत, सोनवणे, सचीन ओझा, माधव भांगरे आदि उपस्थित होते.






