झोमॅटोच्या आयपीओला सेबीची परवानगी

नवी दिल्ली : झोमॅटोने प्रार्थमिक समभाग विक्रीसाठी म्हणजे आयपीओसाठी सेबीकडे परवानगी मागितली होती. सेबीने झोमॅटोला या संबंधात आवश्‍यक ती परवानगी दिली आहे. या माध्यमातून झोमॅटो 8,250 कोटी रुपये उभे करणार आहे.

प्राप्त माहितीनुसार पुढील पंधरवड्यामध्ये झोमॅटो ही भाग विक्री करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जाते. केम प्लास्ट संमर आणि तत्त्व चिंतन फार्मा केम या कंपन्यांनाही सेबीने आयपीओ जारी करण्यासाठी परवानगी दिली आहे. केम प्लास्ट 3,500 कोटी रुपये उभा करणार आहेत तर तत्त्वचिंतन फार्मा केम 450 कोटी रुपये उभे करणार आहे.

दरम्यान क्‍लीन सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी आणि जीआर इन्फ्राप्रोजेक्‍ट या दोन कंपन्यांचे आयपीओ गुंतवणूकदारांना सात जुलै पासून उपलब्ध होणार असून यासाठी गुंतवणूकदारांना नऊ जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे. क्‍लीन सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 1,546 कोटी रुपयाचा आहे जीआर इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स कंपनीचा आयपीओ 963 कोटी रुपयाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here