मेहबुबा मुफ्तींच्या आईला ईडीकडून समन्स

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या आई गुलशन नझीर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. त्यांना मनी लॉण्डरिंग प्रकरणातील चौकशीसाठी 14 जुलैला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

मेहबुबा यांच्या पक्षाने (पीडीपी) मतदारसंघ फेररचना आयोगाच्या पथकाला न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाच्या दिवशीच आईला समन्स बजावण्यात आल्याबद्दल मेहबुबा यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

अज्ञात आरोपांवरून समन्स बजावण्यामागे राजकीय विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न आहे. केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांनाही सोडत नाही. राजकीय वचपा काढण्यासाठी ईडी, एनआयएसारख्या यंत्रणांना हत्यार बनवले जात आहे, असा आरोप मेहबुबा यांनी ट्‌विटरवरून केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here