शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार : सांताक्रुझ येथील कब्रस्तानात होणार अंत्यविधी
मुंबई (टीम अचूक बातमी) : हिंदी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे बुधवारी सकाळी ७.३० वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या पश्चात पत्नी सायरा बानो आहेत. दिलीप कुमार यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी मनोरंजन सृष्टीमध्ये स्वतःचे असे अढळ स्थान निर्माण केले होते. देवदास, मुगल-ए- आझम यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलेले दिलीप कुमार अनेकांसाठी आदर्श होते.
दिलीप कुमार यांचे पार्थिव अॅम्ब्युलन्समधून त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले आहे. आज संध्याकाळी ५ च्या सुमारास सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. घरून त्यांचं पार्थिव थेट स्मशानभूमीत नेण्यात येईल.
State funeral protocols – #DilipKumar saab being draped with the beautiful tricolor. pic.twitter.com/fmYMdJLOBD
— faisal farooqui (@FAISALmouthshut) July 7, 2021
सांताक्रुझ स्मशानभूमीत जाण्यासाठी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानोही निघाल्या आहेत. दिलीप कुमार यांच्या अंतयात्रेला सुरुवात झाली असून, शासकीय इतमामात त्यांना सन्मान दिला गेला. दिलीप कुमार यांचे कुटुंबिय आणि आप्तेष्ट त्यांच्या घरी एकत्रीत झाले.
Veteran actor Dilip Kumar's family, friends gather at his residence ahead of his State funeral, which will be held today at 5 pm in Santacruz, Mumbai. The actor passed away this morning at the age of 98. pic.twitter.com/eY9wh2XQZn
— ANI (@ANI) July 7, 2021






