नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील चौघांचा मंत्रिमंडळात समावेश

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाल्यापासून दिल्लीकडे सगळ्यांकडे लक्ष लागलं होतं. विशेषतः महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्यासह काही जणांची नावे चर्चेत होती. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी वेगवान घडामोडी सुरू होत्या. शपथविधीची वेळ जवळ येत असतानाच कुणाला मंत्रिमंडळात घेणार याविषयी राजकीय वर्तुळात धाकधूक वाढली होती. मात्र, अखेर यावरील पडदा दूर झाला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणाऱ्या ४३ मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यात नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे.मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली होती. यात नारायण राणे यांचं नाव आघाडीवर होतं. त्याचबरोबर हिना गावित, भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील, प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती.

मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आलं होतं. सरकारकडून यादी जाहीर करण्यात आली असून, सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here