जळगाव नगरीच्या महापालिकेचा कारभार ‘अंधेर नगरी चौपट राजा‘

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शहर महानगर शिवसेनेच्यावतीने वारंवरार महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देवूनसुध्दा कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही, जळगाव शहराच्या स्वच्छ पाण्याच्यासंदर्भात निर्णय घेता आला नाही म्हणून, स्वतः शिवसैनिकच पाणीपुरवठा होत असलेल्या फिल्टर प्लॅन्टवर पाहणीसाठी गेले असता, त्यांच्या निदर्शनास काही गंभीर बाबी आल्यात. पाण्यात टाकण्यासाठी तुरटी, क्लोरीन गॅस, ब्लिचिंग पावडर आढळून आलेली नाही. पाणी अस्वच्छ असून, त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले पाणीपुरवठा अधिकारी नॉन टेक्नीकल असून, त्यांची पोस्टींग ही सिव्हील वर्क म्हणून आहे. मात्र महानगरपालिकेने त्यांची नियुक्ती पाणीपुरवठा अधिकारी म्हणून केलेली आहे. या ठिकाणी केमिस्ट अधिकाऱ्याची नेमणूक हवी होती. क्लोरीन ऑपरेटरांची नियुक्ती करायला पाहिजे, मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांची नियुक्ती नसल्याने त्याचा फटका म्हणून जळगाव शहराला अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे.
या अधिकाऱ्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करुन जळगाव शहर महानगरपालिका शहरातील पाच लाख नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत आहे. तरी या गंभीर बाबींची दखल त्वरित घेऊन योग्य त्या अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी तसेच त्यांना आवश्यक त्या सामुग्रीचा पुरवठाही करण्यात यावा, असे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर निलेश सु पाटील, गजानन मालपुरे, संजय कोल्हे, नितीन जावळे, दिनेश पथारिया, लोकेश पाटील, प्रसाद घोरपडे, ईश्वर नाईक, महेंद्र सोनवणे, सौ.मंगला बारी, सौ.निलू इंगळे, चेतन शिरसाळे, मनिषा पाटील, हेमंत महाजन, विजय राठोड, नितीन पाटील, राहुल नेतलेकर, जितू बारी, जितेंद्र गवळी, बिपिन पाटील, आदी पदाधिकारी व शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here