फ्लोरिडा – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’साठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. नासाने मंगळ ग्रहावर आणखी एक रोव्हरचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. मार्स २०२० ही नासाच्या सर्वात महत्वाकांक्षी मोहिमांपैकी एक आहे. नासासह जगातील सर्व देशांमधील अंतराळ संस्थांचे याकडे लक्ष लागले आहे. या मोहिमेमध्ये प्रीझर्व्हन्स रोव्हर पाठविला आहे.
अमेरिकन वेळेनुसार सकाळी ७.५० वाजता आणि भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५.२० वाजता फ्लोरिडाच्या केप कॅनावेरलमधील केनेडी स्पेस सेंटर येथून हे रोव्हर मंगळाच्या दिशेने झेपावले. नासाच्या या मिशनचे नाव मार्स २०२० आहे. नासाने मंगळावर आतापर्यंत ८ यशस्वी मोहिमा पूर्ण केल्या आहेत.
१८ फेब्रुवारी २०२१ ला प्रीझर्व्हन्स रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. ही मोहिम पृथ्वीवरील कालमापनानुसार ६८७ दिवस चालणार आहे. या मोहिमे अंतर्गत पहिल्यांदाच लहान हेलिकॉप्टर मंगळावर उड्डाण करेल.
या मोहिमेत नासाचे प्रीझर्व्हन्स रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावरील प्राचीन जीवनाची माहिती जमवण्यासह तेथील माती, दगड पृथ्वीवर आणणार आहे. या रोव्हर सोबत इंजीन्युटी नावाचे लहान हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. इंजीन्युटी हे नाव मूळ भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ वनीजा रुपाणी यांनी दिले आहे. हे हेलिकॉपटर मंगळाच्या पृष्ठभागावर उड्डाण करण्याचा प्रयत्न करेल. मंगळ ग्रहावरील अत्यंत विरळ वातावरणादरम्यान उड्डाण करत असताना हे हेलिकॉप्टर ग्रहाच्या पृष्ठभागावरून १० फूट उंच उडून एकावेळी ६ फुटांपर्यंत जाईल. मंगळावरील मोहिमेत या हेलिकॉप्टरची महत्त्वाची भूमिका असणार आहे. या मोहिमेत मंगळावरील जीवसृष्टीच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मंगळ मोहिमेत या हेलिकॉप्टरची भूमिका महत्त्वाची असल्यामुळे अनेक चाचण्या घेण्यात येत आल्या.
नासाच्या मंगळासाठी रोवर अभियानाची सुरुवात 1997 मध्ये मार्स पाथफाउंडप मिशनने झाली. या मिशनच्या माध्यमातून नासाने मंगळवर पहिलं रोवर उतरवलं. सोजर्नर नावाच्या या रोवरबाबत अनेकांच्या फार आशा नव्हत्या. मात्र याच्या यशानंतर 2003 मध्ये रोवर मंगळावर पाठवलं.







