जळगाव (निलेश पाटील) – जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ४९ हजार ४५७ कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी १० हजार ५९१ अहवाल पॉझिटिव्ह तर ३७ हजार ५९९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शिवाय इतर अहवालाची संख्या ६३७ असून अद्याप ७०६ अहवाल प्रलंबित आहेत. ७८०९ रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. याचबरोबर जिल्ह्याचा मृत्युदर ४.६५ टक्क्यांपर्यंत ठेवण्यात प्रशासनास यश मिळाले आहे.
जिल्ह्यात संशयित म्हणून तपासणी करण्यात आलेल्या ४९४५७ पैकी १०५९१ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात केलेल्या तपासण्यांपैकी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचा दर हा २१.४१ इतका आहे. विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६६ टक्क्यांपर्यंत गेले आहे. बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत ७०१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३०८२ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.







