पुणे (बाजीराव नाईक) – बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि..चे संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालया समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे
बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि.. पश्चिम महाराष्ट्र कार्य अध्यक्ष भारत तुकाराम मोरे पाटील व कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष सौ हसिम शिराज नुरानी ( भाभी) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान सुखदेव दाभाडे हे कोल्हापूर जिल्हा आधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे ऐक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे असे मातंग समाजातील अनेक नेते,पक्ष,संघटना, आमदार, तसेच खासदार यांनी मागणी केले पण आज समाजात सर्वधर्म समभाव या हेतूने मराठा समाजाचे पश्चिम महाराष्ट्र कार्य अध्यक्ष भारत तुकाराम मोरे पाटील व कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष मुस्लिम समाज संघटनाचे सौ हसिम शिराज नुरानी (भाभी) यांनी सरकारने आमचे मागण्या मान्य करा नाहीतर आम्ही संपूर्ण भारत भर आंदोलन सुरू करु, असा इशारा दिला आहे.







