सांगली जिल्हा महिला संघटक म्हणून नूरजहाँ शेख यांची बिनविरोध निवड

पुणे (बाजीराव नाईक) – बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजिचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा महिला संघटक म्हणून नूरजहाँ जैनुद्दिन शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
साखरवाडी, ता.पलूस येथील राहिवासी नूरजहाँ या सर्वधर्म समभाव मानून सामाजिक कार्य करणाऱ्या महिला म्हणून सांगलीसह अनेक जिल्ह्यात महिलांसाठी लढा देणाऱ्या म्हणून ओळख आहे.समाजाप्रती त्यांची आस्था पाहता त्यांची बहुजन परिवर्तन पार्ट प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजिच त्या सांगली जिल्हा महिला संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य कार्य अध्यक्षा सौ तेजस्वी गणेश कवळे, महिला पुणे संपर्क प्रमुख राष्ट्रीय महिला अध्यक्ष सौ मनिषा बाजीराव नाईक, मध्यप्रदेश महिला अध्यक्ष सौ ज्योती राजेंद्र सिरावले, महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र वसंत सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here