गायत्री डेंबे यांची पुणे संपर्क महिलाप्रमुख म्हणून नियुक्ती

पुणे (बाजीराव नाईक) – बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजिचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे संपर्क महिला प्रमुख म्हणून गायत्री राम डेंबे यांची बिनविरोध निवड
विविध पक्ष संघटना यामध्ये गायत्रीताई यांनी चांगल्या पद्धतीने काम केले आहे. महिला बचत गट महिला स्वयंरोजगार व महिलांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाक्या कार्यकर्त्या म्हणून त्या प्रसिध्द आहेत. आपल्या देशात कोरोणाचे संकट उभे आसून सुध्दा गायत्रीताई यांनी आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा मनापासून करत होत्याअन्न धान्य वाटप करण्यात करत होत्या. समाजाप्रती त्यांची आस्था पाहता त्यांची बहुजन परिवर्तन पार्ट प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजिच त्या पुणे महिला संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल महिला पुणे संपर्क प्रमुख राष्ट्रीय महिला अध्यक्ष सौ मनिषा बाजीराव नाईक, मध्यप्रदेश महिला अध्यक्ष सौ ज्योती राजेंद्र सिरावले, महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र वसंत सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here