- जिल्ह्यातून नांदगाव मध्ये विक्रमी १५१ रक्तदात्यांचे रक्तदान
- मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवसा निमित्त युवा सेनेचे यशस्वी आयोजन
- रक्तदात्याना प्रत्येकी वृक्ष व प्रमाणपत्र भेट
अमरावती (नांदगाव खंडेश्वर) (विशेष प्रतिनिधी) – कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यात रक्तांचा तुटवडा पडत असल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. एकूण १५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून जिल्ह्यात नांदगाव मध्ये विक्रमी रक्तदान झाले.
रक्तदान हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असून तरूणांनी नेहमी रक्तदान करावे असे प्रतिपादन माजी खा. अनंत गुढे यांनी केले. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नांदगाव खंडेश्वर येथे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कोरोना काळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार व जास्त वेळा रक्तदान करणारे उमेश परसनकर यांचा सत्कार करण्यात आला. या रक्तदान शिबिरात महिलांसह तलाठी, वकील संघ, पोलिस कर्मचारी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यावेळी रक्तदात्यांना प्रत्येकी युवासेनेतर्फे एक वृक्ष व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खा.अनंत गुढे, तहसीलदार पियुष चिवंडे, ग.वि.अ. विनोद खेडकर, ठाणेदार संतोष भंडारे, मंगरूळ च. ठाणेदार पडघाण, बाळासाहेब राणे, विलास सावदे, समृद्धी महामार्गाचे व्यवस्थापक पांडे, शोभाताई लोखंडे, रेखाताई नागोलकर, प्रमोद ठाकरे, प्रविण चौधरी, श्रीकृष्ण सोळंके, सुरेशभाऊ राजगुरे उपस्थित होते. रक्तदान शिबिराच्या यशस्वितेकरीता सरपंच गोकुळ राठोड, मधूकर कोठाळे,श्याम मुळे, पवन ठाकरे,अमोल इंगोले, रोशन कडू,सुनील गुरामुळे,उमेश चौकडे, अनिकेत मोरे, अभय बणारसे, यश मारोटकर, पवन तानकर, निलेश झिमटे, निलेश हळदे, राहुल भैसे, मोहन चव्हाण, सुमित चौधरी, अक्षय काकडे, पवन पुसदकर, आशिष हटवार, शुभम ढाकुलकर, पवन शिरभाते, भुमेश्वर गोरे, निलेश मारोटकर, सौरव सोनोने,अमन मानकर, विकी बाविस्थळे, विशाल बसवनाथे, रोशन भातुलकर,शुभम रावेकर, भास्कर सोनटक्के, दिनेश शार, संदीप अंभोरे,मनोज बनारसे, भावेश भांबुरकर, तेजस जवळकर, अक्षय मुके, अंकुश रावेकर, देवेंद्र कटांळे, अमर डोफे, गौरव झिमटे, अनुप काकडे,धनंजय भडके, राहुल मुके,ओम राऊत,इत्यादींनी परिश्रम घेतले.









