- ईद गाह मध्ये नमाज होणार नाही
- रुहते हिलाल कमेटी चा निर्णय
जळगाव (संपादक सुनिल पाटील) – रुहते हिलाल कमेटीची सभा जामा मस्जिद येथे मौलाना उस्मान कासमी, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यात सर्वानुमते ठरले की ईद उल अझहा(बकर ईद) ची नमाज १ ऑगस्ट शनिवारी होईल परंतु कोरोना च्या आजरा मूळे व शासनाच्या १७ जुलै च्या मार्गदर्शन सूचना व स्थानिक प्रशासन यांच्या सोबत झालेल्या २४ जुलै व २८ जुलै च्या सभे अनुसार ईदगाह मध्ये नमाज होणार नाही तरी नमाज घरीच अदा करावी असे सर्वानुमते ठरले.
सभेत सर्व प्रथम ईद गाह चे सरचिटणीस फारूक शेख यांनी शासनाचे सर्व आदेश व मार्गदर्शन सभे समोर मांडले त्यावर ट्रस्ट चे अध्यक्ष गफ्फार मलिक यांनी महाराष्ट्र व देशातील स्थिती अवगत केली.
शहर ए काझी मुफ्ती अतिकुररहेमान यांनी कुर्बानी चे महत्व व त्याचे उपाय योजना सांगितल्या. सभेत सर्वानुमते कुर्बानी मूळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखता कामा नये,स्वच्छता ठेवावी, व कोरोना हा संपूर्ण जगातून नष्ट व्हावा या साठी अल्लाह कडे प्रार्थना करावी असे ठरले.
या सभेत मौलाना उस्मान कासमी,मुफ्ती अतिकुर रहेमान, मौलाना झाकीर, मौलाना अख्तर नदवी,मौलाना नासिर,हाफिज रेहान,हाफिज वसीम,कारी सैयद झाकीर, कारी शाफिक पटेल,मौलाना अबुझर, सैयद चाँद, सैयद मुश्ताक अली,अश्फाक बागवान,मुकीम शेख,अनिस शाह,ताहेर शेख,डॉ जावेद शेख,मोहम्मद एजाज,इनायतुल्लाह खान, यांची उपस्थिती होती.
सभेची सुरवात मुफ्ती अतिक यांच्या पवित्र कुराण पठणाने तर सांगता मौलाना उस्मान यांच्या दुआ ने झाली.सूत्रसंचालन फारूक शेख यांनी केले







