भाजप नेत्याच्या दिलीपकुमारांवरील वादग्रस्त ट्वीटवर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर भडकल्या

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनवर भाजप नेत्याने केलेल्या ट्विटवरुन उर्मिला मातोंडकर यांनी त्याला चांगलेच फटकारले. हरियाणा भाजप आयटी विंग प्रमुखाने दिलीप कुमार यांच्या निधनावर केलेल्या ट्विटवर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर चांगल्याच भडकल्या.

हरियाणा भाजप आयटी विंग प्रमुख अरुण यादव यांनी हिंदीतून ट्विट करत दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ‘सिनेसृष्टीत हिंदू नाव ठेवत किर्ती प्राप्त केलेल्या मोहम्मद युसूफ खान ( दिलीप कुमार ) यांच्या निधनाने सिनेसृष्टीची न भरुन येणारी हानी झाली आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना. त्यांच्या दिवंगत आत्म्यास शांती लाभो.’ असे ट्विट केले होते.

या ट्विटवर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे.’ असे ट्विट केले. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे मुंबईत आज ( दि. ७ जुलै ) दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. या बाबतची माहिती दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली. त्यांचे हे ट्विटर अकाऊंट त्यांचे कौटुंबिक मित्र फैसल फारुकी हे सांभाळतात. त्यांनी ‘जड अंतःकरणाने आणि अतिव दुःखाने सांगतो की आपले प्रिय दिलीप साहेबांचे काही मिनिटापूर्वीच निधन झाले. आपल्याला परमेश्वरानेच पाठवले असते आणि त्याच्याकडेच आपण परततो.’ असे ट्विट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here