अचानक प्रकृती खालावल्याने एकनाथ खडसेंची पत्रकार परिषद रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसने दिली अधिकृत माहिती

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : पुण्याच्या भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडलेले आहेत. जावयाच्या अटकेनंतर त्यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज त्यांची पत्रकार परिषद होणार होती. आजच्या पत्रकार परिषदेत खडसे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा होती. मात्र त्याअगोदरच त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे, अशी अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेली आहे.

आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना समन्सच्या माध्यमातून देण्यात आले. तत्पूर्वी ईडी कार्यालयातल्या हजेरीअगोदर एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार होते. या पत्रकार परिषदेत ते काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा होती. परंतु त्या अगोदरच प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद खडसेंना रद्द करावी लागलेली आहे.

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे यांना फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री पद गमवावे लागले होते. यानंतर खडसे यांची चौकशी झाली. झोटिंग समितीने त्यांना क्लीन चिट देखील दिली. मात्र पुन्हा एकदा त्यांना चौकशीला सामोरे जावं लागलं. पदाचा दुरुपयोग करत जमिन खरेदी केल्याचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here