शिवसेना व युवासेनेच्या माध्यमातून शिंदखेड्यात भव्य गॅस नोंदणी कॅम्प संपन्न

शिंदखेडा (प्रतिनिधी) : येथील जनता नगर, माळीवाडा परिसरात शिवसेना-युवासेनेच्या माध्यमातून तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब हेमंत साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत एकदिवशीय भव्य गॅस नोंदणी कॅम्प संपन्न झाला. या कॅम्पला मोठ्या प्रमाणात नागरीकांनी प्रतिसाद दिला. 210 नागरिकांनी आपली गॅस नोंदणी या माध्यमातून करून घेतली.

एकीकडे शहरी भागात सर्वत्र स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतांना आजही ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी लाकडे, काड्या, शेतातील कचरा याचा वापर केला जातो. ग्रामीण भागात गरीब कुटूंबांना गॅस व शेगडी विकत घेणे आजही दुरापास्त आहे. यासाठी शासनाने उज्वला गॅस योजना सुरु केली आहे. मात्र या योजनेचा लाभ ग्रामीण भागात अत्यल्प घेतला जातो.

ग्रामीण भागातील गोरगरीबांची होणारी अडचण लक्षात घेता तसेच जास्तीत जास्त गरीबांनी शासनाच्या उज्वला गॅस योजनेचा लाभ घ्यावा यासाठी शिवसेना-युवासेनेच्या माध्यमातून बुधवार दि. 07 जुलै 2021 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपावेतो एकदिवशीय भव्य गॅस नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पला मोठ्या प्रमाणात नागरीकांनी प्रतिसाद दिला. 210 नागरिकांनी आपली गॅस नोंदणी या माध्यमातून करून घेतली.

यापुर्वी देखील शिवसेना तसेच युवासेनेच्या माध्यमातून परिसरातील 155 लाभार्थ्यांना उज्वला गॅस योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हे शिवसेनेचे सुत्र असून त्याप्रमाणे आजपर्यंत लोकोपयोगी कामे करत आलो आहे. यापुढे देखील शिवसेनेच्या माध्यमातून गोरगरीबांसाठी असेच कार्य करत राहू, असे मत विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी यांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवासेना तालुकाप्रमुख प्रदिप पवार, युवासेना शहरप्रमुख योगेश माळी, शिवसेना उपशहरप्रमुख किशोर पाटील, वाहतुक सेनाप्रमुख नाना पहाडी, भुषण परदेशी, ईश्वर माळी, कुणाल जाधव, राकेश परदेशी, चेतन परदेशी, निलेश परदेशी आदी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here