केंद्रात मंत्रिपद मिळताच कपिल पाटील यांचा मोठा निर्णय

नवी मुंबई विमानतळाबद्दल स्थानिकांच्या भावनांचा आदर केलाच पाहिजे

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा पाटील यांचं नाव देण्यावरून सुरू असलेला वाद हा सगळ्यांनाच माहिती आहे. यासंबंधी नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना विचारलं असता, नवी मुंबई विमानतळावर लोकनेते दि. बा पाटील यांचं नाव द्यावं अशी माझी आणि स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीचा आणि त्यांच्या भावनांचा आदर केला गेलाच पाहिजे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे माझं लक्ष असणार आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत मोदींनी विश्वासाने दिलेल्या केंद्रीय मंत्रीपदाचा मी देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त फायदा करून घेणार आहे. माझी जन्मभूमी असलेल्या भिवंडी लोकसभेमध्येदेखील आणि ठाण्यातील विकास कामांकडेदेखील लक्ष देणार आहे, असं कपिल पाटील यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here