ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : बुधवार दिनांक-07/07/2021रोजी प्रभाग क्रमांक 15 मध्ये कार्यसम्राट नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या प्रयत्नाने ठाणे महानगरपालिका covid-19 लसीकरण सुरू करण्यात आले .
या लसीकरण केंद्राचा लाभ प्रभागातील जय भवानी नगर केणी नगर आदिवासी पाडा आंबेवाडी साठे नगर इंदिरानगर इथल्या नागरिकांना घेता येणार आहे बरेच दिवसापासून आपल्या प्रभागात एकही लसीकरण केंद्र नव्हते आणि ही नैतिक जबाबदारी समजून प्रभाग क्रमांक 15 मधील कार्यसम्राट स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेची अधिकारी कर्मचारी यांना भेटून विनंती करून हे केंद्र या ठिकाणी घेण्यात आले.
जवळपास प्रभागातील लोकांना बाहेर जाता येत नसल्यामुळे याचा अतिशय प्रभावी फायदा लोकांना मिळू शकतो त्यांनी सांगितल्याप्रमाणे आठवड्यातून दोनदा तरी लसीकरण हे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे असे माहिती त्यांनी दिली आहे याप्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला.